सिंधुदुर्गात बैलांची झुंज प्रकरणी 12 जणांवर गुन्हा; मुंबईच्या माजी महापौरांचा समावेश; ‘पाल’ संस्थेने केली तक्रार

0
62

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

मालवण- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तळगावमध्ये बैलांच्या झूंज लावल्यामुळे त्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे.
बैलांच्या झुंज लावून त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाल्याने मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह 12 जणांना आज अटक करून न्यायालयात हजर केलं गेले.

याप्रकरणी मुंबईच्या प्युअर अ‍ॅनिमल लव्हर (पाल) या प्राणीमित्र संस्थेने या विरोधात मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here