आजपासून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रत्येकाची रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. तसेच शासकीय रुग्णालयात कोविड रुग्णांना भेटण्यासाठी येणाऱ्या नातेवाइकां चीही टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. जिल्हा रुग्णालयातील कोविड कक्षात नातेवाइक गर्दी करतात.
यामुळे कोरोना संसर्गाची शक्यता अधिक प्रमाणात वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील कोविड सेंटरवर येणाऱ्या नातेवाइकांचीही कोरोना टेस्ट केली जाणार आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांचा मृतदेह गावी नेण्यासाठी दोन शववाहिन्या लवकरच उपलब्ध करून देत असल्याचीही ग्वाही श्री. सामंत यांनी दिली.