मुबंई- कोकणालाच सर्वात मोठा सागरी किनारा लाभलेला असून तिथेच सर्वात जास्त मासेमारी होत असते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मत्स्य महाविद्यालय सुरू होणार आहे. त्यामुळे कोकणात आता नीलक्रांती होणार असल्याचे भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आज सांगितले.
कणकवली येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली. कोकणात मासेमारी हा मोठा व्यवसाय असतानाही मत्स्यविद्यापीठ देखील विदर्भातील नागपूरमध्ये आहे. त्यामुळे राज्याचे मत्स्यव्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना 23 सप्टेंबर 2022 रोजी पत्र पाठवून सिंधुदुर्गात मत्स्य महाविद्यालय सुरू करण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. त्याला राज्य शासनाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून सिंधुदुर्गात लवकरच मत्स्य महाविद्यालय सुरू होणार आहे, असे नितेश राणे म्हणाले.


