ओरोस: संपूर्ण राज्यात माहे मे २०२२ ते १५ जून २०२२ या कालावधीत “अमृत जवान अभियान-२०२२” राबविण्यात येत आहे. या अभियानात सिंधुदुर्ग शहिद जवान,त्यांच्या विधवा, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, माजी सैनिक कुटुंबिय सेवारत सैनिक यांच्या प्रलंबित कामांचा निपटारा जलद होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांमध्ये अभियानात जास्तीत जास्त सैनिक कुटुंबियांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
विविध विभागांमध्ये माजी सैनिक, शहिद जवान व सेवारत सैनिकांची अनेक कामे असतात. महसूल विभागाकडे प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भूसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी,विविध प्रकारचे दाखले, रेशन कार्ड संबंधित कामे, पोलीस विभागाकडे विविध तक्रारी/ समस्या, समाजकंटकांकडून होत असलेल्या त्रासाबाबतच्या समस्या, कृषी विभागाकडील लाभ घेण्याबाबतचे प्रस्ताव, फौजदारी स्वरुपाचे वाद, शहिद जवा व सेवारत सैनिकांचे प्रश्न, परिवहन विभागगकडील परवाने, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे इत्यादी, तसेच अनेक कामे प्राधान्याने मार्गी लावणे आता या अभियानामुळे मार्गी लागणार आहेत.
या अभियानामध्ये प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लाकशाही दिनाच्या धर्तीवर “अमृत जवान सन्मान दिन” आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित विभाग प्रमुख व सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा आढवा घेण्यात येणार आहे. या अभियान राबविण्यासाठी जिल्हा स्तरीय व तालुकास्तरीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आली आहे. त्या अनुषंगाने तालुका तसेच जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली असून समन्वय अधिकऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तहसिल कार्यालयामध्ये एक खिडकी या तत्वाप्रमाणे “सहायता कक्ष “स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत सेवारत सैनिक/ माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील व त्याच दिवशी अर्ज संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील. याअभियान शहिद जवान कुटुंबिय सेवारत सैनिक/ माजी सैनिकासांठी मार्गदर्शनपर विशेष मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ही जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे


