सिंधुदुर्ग – आगीतील नुकसानग्रस्ताला केसरकरांकडून आर्थिक मदत

0
56
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी सुरेश कौलगेकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला शहरातील साई मंगल कार्यालय समोरील कापड दुकानास सोमवारी रात्री आकस्मिक आग लागून मोठे नुकसान झाले होते. संबंधित नुकसानग्रस्त अलमास मुजावर यांना आमदार दिपक केसरकर यांनी २५ हजार रुपये त्वरित आर्थिक मदत दिली आहे. मोठे नुकसान झाल्याने त्यांना त्वरित आर्थिक मदत मिळावी यासाठी सचिन वालावलकर यांनी त्वरित पाठपुरावा केला. सदर मदतीचा चेक वेंगुर्ला निवडणूक नायब तहसिलदार संदिप पाणमंद यांनी नुकसानग्रस्तांना दिला. यावेळी मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगेमाजी नगरसेविका सुमन निकमशहर तलाठी गवतेसामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here