सिंधुदुर्ग :आचरा, वायंगणी, मालोंड,विरण येथील १२ कोटी रु. च्या विकास कामांची भूमिपूजने

0
126

खा.विनायक राऊत,ना.उदय सामंत,आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आचरा गणपती मंदिर-रामेश्वर मंदिर-डोंगरेवाडी ते पारवाडी रस्त्यासाठी ३ कोटी ३५ निधी मंजूर झाला आहे. तर वायंगणी बौद्धवाडी सापळेबाग ते तोंडवळी रस्त्यासाठी ४ कोटी ७२ लाख व मालोंड विरण रस्त्यासाठी ३ कोटी व मालोंड गडनदी तर जेटीसाठी २५ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरॊबर बजेट अंतर्गत विरण पोईप येथे काँक्रेट गटारासाठी ४९ लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांचे भूमिपूजन आज खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.


कोरोनाच्या कालावधीत निधीची कमतरता असताना देखील आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघातील कामे मंजूर करून घेतली याबद्दल आ. नाईक यांचे खा. विनायक राऊत यांनी याप्रसंगी कौतुक केले. मालवण मधील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही. लागेल तेवढा निधी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी उपलब्ध करून देऊ. येणाऱ्या निवडणुकांमध्ये नागरिकांनी शिवसेनेच्या पाठीशी खंबीर राहून शिवसेना उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले.


आमदार वैभव नाईक म्हणाले, रस्ते चांगले असतील तरच त्या त्या भागातील विकासाला गती मिळते. अतिवृष्टीमुळे जे जे रस्ते खराब झाले त्यांच्या दुरुस्ती साठी निधी मंजूर केला आहे. कोरोनामुळे रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम थांबले होते. मात्र आता रस्ता दुरुस्तीला सुरुवात करण्यात येत आहे. ज्या ठेकेदारांना रस्त्यांची व इतर कामे मिळाली आहेत त्यांनी ती कामे दर्जेदार करावीत. नागरिकांनी देखील या कामांवर लक्ष ठेवावे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्र्यांच्या तसेच सरकारच्या माध्यमातून मतदारसंघासाठी आणखी निधी आणला जाईल. शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते देखील विकास कामांसाठी पाठपुरावा करत आहेत. असे सांगितले.

याप्रसंगी मालोंड येथे जी.प. गटनेते नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जी. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर,पोईप विभागप्रमुख विजय पालव, सरपंच वैशाली घाडीगावकर, छोटू ठाकूर, पंकज वर्दम,अमित भोगले, भाऊ चव्हाण, राजेश गावकर, समीर हडकर, आशिष परब, बंडू चव्हाण, पराग नार्वेकर, किरण प्रभू, नाना नेरकर, बाळा परब, गोविंद परब,कमलाकर सुर्वे,सुहास सुर्वे, मकरंद तांडेल, भाऊ घाडीगावकर, दिनकर जोशी, दीपिका मेस्त्री, बाळा पारकर, पद्माकर फणसगावकर, सुभाष परब, पांडुरंग तांडेल आदी.

आचरा येथे विभाग प्रमुख समीर लब्दे, जगदीश पांगे, आबा दुखंडे,पंचायत समिती सदस्या निधी मुणगेकर, श्रीकांत सांबारी भाऊ परब, ग्रा. प. सदस्या अनुष्का गावकर,मंगेश गावकर, राजन गावकर, रवी गुरव, पांडू वायंगणकर, सुभाष धुरी, गणेश तोंडवळकर, नितीन घाडी, आबा खोत, राजन पांगे, बाबा सावंत, आबा वायंगणकर आदी

वायंगणी येथे तोंडवली सरपंच आबा कांदळकर, वायंगणी सरपंच संजीवनी रेडकर, माजी विभागप्रमुख उदय दुखंडे, सदा राणे, अनिल गावकर, चंद्रकांत गोलतकर, सुनील माळकर, ब्रम्हनाथ टिकम, संतोष सावंत, नारायण सावंत, दिनेश साळकर, राजू पेडणेकर, अनिल बांदेकर, सचिन रेडकर, श्रीकृष्ण वायंगणकर, संजू सावंत, बबन सावंत आदि

विरण येथे पोईप सरपंच गिरीजा पालव, शिवराम पालव, संतोष हिवाळेकर, अजिंक्य परब, सोमनाथ माळकर , ज्ञानेश्वर वाडकर, सतीश राठोड, हेमंत पारकर, गिरीष पालव, गोपीनाथ पालव, शुभम भाटकर, नाना तावडे आदी उपस्थित होते.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here