सिंधुदुर्ग- आज कोकणसह मराठवाड्यात ‘यलो’ अलर्ट तर विदर्भात ‘ऑरेंज’ अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0
25

मुबंई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज कोकणसह मराठवाड्यात मुंबईच्या हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडताना दिसत आहे. मात्र, आता राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज (20 ऑगस्ट) रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here