सिंधुदुर्ग: आमदार नितेश राणे अडचणीत; जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला 

0
77

सिंधुदुर्ग: नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. त्यांचा जामीन अर्ज आज पुन्हा एकदा फेटाळण्यात आला आहे. यानंतर ते आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहेत.

‘नितेश राणेंचा जामीन नाकारला आहे. इथे जामीन मिळणार नाही याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे आम्ही लगेचच उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. उद्या किंवा परवा सुनावणी होईल’ नितेश राणेंचे वकील म्हणाले.

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. तसेच भाजप आमदार नितेश राणे यांच्यावरही शिवसेनेकडून हल्ल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here