प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
कुडाळ_शिवसेनेत निर्माण झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा युवासेनेची महत्वाची बैठक कुडाळ एम.आय.डीसी येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. जिल्हाभरातून ३५ जिल्हा पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठ पातळीवर कोणत्याही घडामोडी घडल्या तरी युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा एकमुखी निर्धार उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.
जिल्ह्यातील युवासेनेचा कोणताही पदाधिकारी वेगळा विचार करीत नसल्याचे स्पष्ट झाले. भविष्यात शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब, पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब आणि युवासेनाप्रमुख मा. आदित्यसाहेब यांचा विचार, वसा जिल्ह्याच्या कानाकोप-यात नेण्याचा तसेच आगामी सर्व निवडणुकांत संघटनेचा झेंडा डौलाने फडकवण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. व्यापक संपर्क अभियान राबविण्याचा तसेच तालुकानिहाय युवासैनिकांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.सदर कार्यकारिणीची बैठक कुडाळ येथे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली


