आयुष्यमान भारत पखवारा (पंधरावाड) निमित्त एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस.एच पाटील यांनी दिली आहे. आयुष्यमान भारत 15 ते 30 सप्टेंबर, आरोग्य मंथन 24 ते 26 सप्टेंबर आणि आयुष्यमान भारत दिवस 23 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधित होणार आहे. त्यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड व आभा कार्ड काढून देण्यात येणार आहेत.
आरोग्य शिबिरे पुढीलप्रमाणे आयोजित करण्यात आलेली आहेत. उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे 16 सप्टेंबर 2022 रोजी तसेच उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे 20 सप्टेंबर 2022 रोजी व उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे 20 सप्टेंबर 2022 रोजी आणि ग्रामीण रुग्णालय,कुडाळ येथे दि.21 सप्टेंबर 2022 रोजी व ग्रामिण रुग्णालय, मालवण येथे 19 सप्टेंबर 2022 रोजी आणि ग्रामपंचायत नागवे, कणकवली येथे 20 सप्टेंबर 2022 रोजी येथे शिबीर आयोजित करण्यात आली आहेत.


