सिंधुदुर्ग: आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. निधी मंजूर!

0
114
आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. निधी मंजूर

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

     

सिंधुदुर्ग: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे राज्य नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मालवण नगरपरिषदेसाठी पुन्हा एकदा १ कोटी ४० लाख रु. चा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून मालवण शहरातील अनेक विकास कामे मार्गी लावण्यात येणार आहेत.

मालवण शहरातील विकास कामांना निधी मंजूर करण्याची मागणी महेश कांदळगावकर, भाई गोवेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, गणेश कुडाळकर, बाबी जोगी, पंकज सादये, मंदार ओरोसकर, नरेश हुले, अमेय देसाई, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शिला गिरकर, दर्शना कासवकर, आकांक्षा शिरपुटे इतर शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व मालवण वासियांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती. मालवण शहरातील विकास कामांना निधी मंजुरीचा शासन निर्णय ०१ फेब्रुवारी २०२२ रोजी निर्गमित करण्यात आला असून आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. गेल्याच महिन्यात आमदार वैभव नाईक यांनी मालवण नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांसाठी देखील दीड कोटीचा निधी मंजूर करून आणला होता.

यामध्ये मालवण नगरपरिषद हद्दीतील सेवांगण रोड ते कॅलिक क्रॉस गटारावर लादीकरण करणे, मेथर घर ते रोड क्रॉसिंग मोरी बांधणे, काजरेकर घर ते प्राईड हॉटेल गटार बांधणे या तीन कामांना १० लाख रु निधी मंजूर करून आणला आहे.

सोमवारपेठ-भाजी मार्केट ते जंगल हॉटेल नजीक समोरील आर.सी.सी. गटार बांधकाम करणे, सोमवारपेठ नेरुरकर घरानजिक रोड क्रॉसिंग व अस्तित्वातील गटार व आरसीसी स्लॅब घालणे व बंदिस्त करणे, ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस श्री. पारकर घर ते श्री कुलकर्णी घर पाणंद कॉंक्रिटकरण करणे, मुख्य बाजारपेठ चॅपेल क्रूस ते मच्छी मार्केटकडे जाणारे समुद्रनजीकचे गटार बांधकाम व क्रॉसिंग करणे, मेढा आचरेकर झेरोक्स अंतर्गत रस्त्यास कोसळलेली साईडवॉल बांधणे या पाच कामांना १० लाख रु निधी मंजूर करून आणला आहे.

भंडारी हायस्कूल समोरील गटर बांधकाम करणे, कोतेवाडा येथील रोझरी चर्च जवळील मयेकर गल्ली येथील शिरोडकर घराजवळील कंपाउंड वॉल बांधणे व रुंदीकरण करून पाणंद कॉंक्रिटकरण करणे, गवंडीवाडा आशापार्क येथील ESR मधील जीना (Staircase) लोखंडी जाळीने बंदिस्त करणे,, दांडी येथील श्री. सुमन शंकर लोणे, दांडी येथील श्री परब व एस.टी.स्टॅण्ड दलितवस्ती मधील व इतर सार्वजनिक विहिर दुरुस्त करणे, सातेरी मंदिर रानडे घर ते चव्हाण घर पाणंद कॉक्रिटकरण करणे, मिठबावकर ते अंकुश तारी घरानजीक पाणंद व रोड क्रॉसिंग करणे, मालवण रेवतळे चंडिका मांड मड्ये घरासमोरील पावसाळी पाणी जाण्यासाठी मोरी बसविणे या सात कामांना ११ लाख निधीमंजूर करून आणला आहे.

धुरीवाडा खोर्जे घर ते सार्वजनिक शौचालयाकडे जाणारी पाणंद कॉंक्रिटकरण करणे, मामा वरेरकर नाट्यगृह नजीक स्वामी हॉटेल समोर पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी आरसीसी रोड क्रॉसिंग करणे, मालवण रेवतळे शाळा प्राथमिक शाळा नजीक मोरीचे बांधकाम करणे, राजकोट कवटकर घरानजीक मुख्य रस्ता ते अस्तित्वातील बंधारा लेव्हल काँक्रिटकरण करणे, देऊळवाडा मेन रोड ते विजय गावकर घरापर्यंत अस्तित्वातील पाणंद कॉक्रिटकरण करणे, नाईकवाडा ते शरद गावकर घरापर्यंत अस्तित्वातील पाणंद कॉक्रिटकरण करणे या सहा कामांना १० लाख निधी मंजूर करून आणला आहे.

मिठबावकर ते अंकुश तारी घरापर्यत पावसाळी पाण्याचा निचरा होणेसाठी रोड क्रॉसिंग करणे, मेढा मोंडकर घर वाघ घरासमोरील रोड क्रॉसिंग गटार बांधणे,आडारी रोड मालवणकर घरासमोरील रोड क्रॉसिंग गटार बांधणे, आडवण हिंदळेकर घरासमोरील रस्त्यास मोरी क्रॉसिंग करणे, धुरीवाडा प्रलाद चिंदरकर ते धावडे घर महापुरुष पाणंद लादीकरण करणे, रेवतळे काळंबी घर ते नामनाईक घरासमोरील मोरी क्रॉसिंग करणे, वसंत विहार गवंडी पाणंद काँक्रिटकरण करणे, वायरी मिठबावकर घर ते मुणगेकर घरासमोरील मोरी क्रॉसिंग करणे, ठूबरे घराकडे जाणारी अस्तित्वातील पाणंदीची उंची वाढवून कॉंक्रिटकरण करणे,सोमवारपेठ नेरुरकर घर ते भंडारी हायस्कूल हॉल पर्यंत गटार बांधून आरसीसी लाद्या बसविणे,आडवण मुख्य रस्ता मनाली ठोंबरे घरापर्यंत जाणारी पाणंद कॉक्रिटकरण करणे, विविध ठिकाणी बैठकीसाठी सिमेंट बेंचेस पुरविणे व बसविणे या १२ कामांना १६ लाख ४० हजार निधी मंजूर करून आणला आहे.

बेवडाबिल्डींग ते फारुक मुकादम घर व सुरेश प्रभू ते कोचरेकर घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण खडीकरण, डांबरीकरण करणे निधी ३० लाख, गवंडीवाडा बाळू कोळबकर घर ते आशापार्क रस्ता मजबुतीकरण व खडीकरण डांबरीकरण करणे निधी ४० लाख मंजूर करून आणला आहे.
गवंडीवाडा प्रतिभा चव्हाण घराकडून टॉकीज कडे जाणाऱ्या रस्त्यावर लादीकरण करणे व वायरी नेरकर पाणंद गटार बांधकाम करणे या २ कामांना १० लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here