सिंधुदुर्ग: आ.वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात मांडला वृद्ध कलाकार पेंशन प्रश्न

0
60
आमदार वैभव नाईक
सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तोडफोड प्रकरणी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

वृद्ध कलाकार पेंशन प्रश्नावर अपेक्षित कार्यवाही करण्याची ना.अमित देशमुख यांची ग्वाही

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यात वृद्ध दशावतारी कलाकार, भजनी कलाकार यांची संख्या मोठी आहे. जिल्हास्तरावर वृद्ध कलाकारांच्या पेंशन संदर्भात बैठक होते. त्यात हजारो प्रस्ताव दाखल झालेले असतात त्यातील केवळ १०० प्रस्तावांना मान्यता दिली जाते. त्यामुळे अनेक पात्र कलाकार या योजनेपासून वंचित राहत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक वेगळी योजना आखून मान्यता दिल्या जाणाऱ्या प्रस्तावांची संख्या वाढवावी ज्यामुळे जास्तीत जास्त वृद्ध दशावतारी,भजनी कलाकारांना पेंशन योजनेचा लाभ मिळेल. त्याबाबतची कार्यवाही केली जाईल का? अशा प्रश्न आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केला.

त्याचबरोबर कोरोना काळासाठी कलाकारांना अनुदानाची योजना डिसेंबर मध्ये जाहीर करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या दिरंगाई मुळे मार्च महिना आला तरी एकाही कलाकाराला अनुदान मिळाले नाही. दशावतारी मंडळे यांना देखील अनुदान जाहीर केले मात्र ते देखील मिळाले नाही. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? याबाबत आमदार वैभव नाईक यांनी विचारणा केली त्यावर सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी या योजनेत सुधारणा करण्यात येणार असून आ. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांचा अंतर्भाव योजनेत केला जाईल अशी ग्वाही दिली.

       

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here