सिंधुदुर्ग : आ.वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ रोजी शिरवल फार्मसी कॉलेज येथे भव्य रक्तदान व महिला आरोग्य तपासणी शिबिर

0
116

प्रतिनिधी पांडुशेठ साठम

कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिरवल येथील विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.२६ मार्च २०२२ रोजी सकाळी ०९ ते १२ वाजेपर्यंत हे शिबीर घेण्यात येणार आहे. कोल्हापूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील रक्तपेढी विभागाचे आरोग्य अधिकारी कर्मचारी रक्त संकलन करणार आहे.

तरी कणकवली तालुक्यातील इच्छुक नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी मोबा.न. – ९४२११४८१२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन कॉलेजचे संचालक श्री. मंदार सावंत यांनी केले आहे.त्याचबरोबर २६ मार्च रोजी दुपारी ०२ ते ०५ या वेळेत महिला आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here