वेंगुर्ला प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पूणे मार्फत जून २०२२मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश प्राप्त करुन एनएमएमएस परीक्षेतील यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. स्कूलमधील दिपेश वराडकर याने जनरलमधून जिल्ह्यात २३वा तर ओबीसी प्रवर्गातून ८वा क्रमांक प्राप्त केला. तर दिपक साळगांवकर याने ओबीसी प्रवर्गातून जिल्ह्यात १२वा क्रमांक प्राप्त केला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांना शासनाची एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
या विद्यार्थ्यांना दिपक बोडेकर, पल्लवी अंधारी, मुख्याध्यापक उमेश वाळवेकर, एनएमएमएस परीक्षा प्रमुख मनाली कुबल यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शक शिक्षकांचे आणि या परीक्षेची ऑनलाईन प्रक्रिया करणारे अजित केरकर यांचे संस्था चेअरमन विरेंद्र कामत-आडारकर, सचिव रमेश नरसुले, सदस्य, पालक-शिक्षक संघ सदस्य, कर्मचारी वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो – दिपेश वराडकर, दिपक साळगांवकर