सिंधुदुर्ग: ओमीक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. लग्न समारंभासाठी बंदिस्त अथवा मोकळ्या जागेत तसेच इतर सामाजिक, सांस्कृतिक राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीतही जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी असेल. अंतिम संस्कारासाठी 20 व्यक्तींना परगानगी असणार आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज लागू केले.
या आदेशात म्हटले आहे, राज्यशासनाच्या महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाने 30 डिसेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात कोविड-19 ओमिक्रॉन विषाणूचा फैलाव होण्यास प्रतिरोध (प्रतिबंध) करण्यासाठी नवीन निर्बंध संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करीत आहे.
• लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहामध्ये किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी असेल. • इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, उपस्थितांची उपस्थिती बंदिस्त सभागृहासाठी किंवा मोकळ्या जागेत जास्तीत जास्त ५० व्यक्तीपुरती मार्यादित असेल. • अंतिम संस्कारच्या बाबतीत जास्तीत जास्त २० व्यक्तींना परवानगी असेल. • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण स्थानिक कोव्हीड-१९ ची साथरोग परिस्थिती विचारात घेवून संबधित शासकीय यंत्रणांशी विचार विनिमय करुन जिथे आवश्यक वाटेल तेथील निर्बंधांमध्ये वाढ करु शकेल.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, अस्थापना शासनाने यापूर्वी लागू केल्यानुसार दंडात्मक कारवाईस तसेच भारतीय दंड विधान संहिता कलम १८८,२६९,२७०,२७१ तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ सह अन्य तरतुदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील.