शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना असे उपक्रम शिक्षणाच्या प्रवाहात आणतात- पोलीस निरीक्षक अमित यादव
वैभववाडी (मंदार चोरगे)
नाधवडे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून कोलमडून गेलेली शैक्षणिक वर्षे सरुन गेली आणि काल बुधवार दि.१५-०६-२०२२ रोजी पासून २०२२-२३ या नव्या शैक्षणिक धोरणाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र शाळा प्रवेशासाठी विद्यार्थी व पालक यांची पाऊले शाळेच्या दिशेने चालू लागली आहेत. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुन्हा नव्या उमेदीने या शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली आहे. शाळा महाविद्यालय यांच्या बरोबरीने काही सामाजिक संस्था, संघटना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी पुढे आल्या आहेत.
वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावातील औदुंबर सेवा ट्रस्ट व श्री.दत्त माऊली महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने नाधवडे गावातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात पुरतील इतक्या वह्या व स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव उपस्थित होते. शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना असे उपक्रम शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करतात असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. मुलांना दिलेल्या वहितील एकही पान वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रम प्रसंगी औदुंबर सेवा ट्रस्ट चे पदाधिकारी मनोहर नारकर, संतोष सावंत, बाबा खांडेकर, अंकित शेट्ये, प्रफुल्ल घाडी, नीरज तानवडे, दिपक कुडतरकर , पोलीस निरीक्षक अमित यादव, माजी सभापती दिगंबर (बंड्या) मांजरेकर,जि.प. सदस्य सुधीर नकाशे.,बाबा कोकाटे, परशूराम इस्वलकर, श्रीरंग पावसकर, नाधवडे हायस्कूल चे मुख्याध्यापक डी.एस.पाटील. तसेच नाधवडे गावातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील शिक्षक व विद्यार्थी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


