प्रतिनिधी-अभिमन्यू वेंगुर्लेकर
कणकवली: आधुनिक विज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचे प्रस्थ असताना आपले ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जपणारे साहित्य अनेक वर्षे ही वाचनालये जतन करत आहेत. अनेक विद्यार्थी व वाचकांना संदर्भग्रंथ उपलब्ध करून शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे साहाय्य करत आहेत. साहित्य सहज उपलब्ध करून देणारी अशी वाचनालये सुस्थितीत सुरू राहणे हे आवश्यक आहे.
कणकवलीतील ज्येष्ठ लेखिका वैजयंती करंदीकर यांनी वेतोरे येथील श्री देवी सातेरी सार्वजनिक वाचनालयाला ५५० पुस्तकांची देणगी दिली .यावेली आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी सध्याच्या डिजिटल युगात भंजाळलेल्या मानसिकतेत सांस्कृतिक ठेवा व वाचनसंस्कृती जपणारी ही मंदिरे उभी राहणे आवश्यक असल्याचे मत करंदीकर यांनी व्यक्त केले.यावेळी श्री देवी सातेरी सा.वाचनालयाचे अध्यक्ष विवेक गोगटे व सामाजिक कार्यकर्ते संदीप गोगटे उपस्थित होते.