सिंधुदुर्ग: संतोष परब हल्ला प्रकरणात संशयित आरोपी म्हणून भाजप आमदार नितेश राणे यांना अटक झाली. काल जवळपास ५ तास नितेश राणे यांची चौकशी करण्यात आली. यानंतर कणकवली पोलिस त्यांना गोव्याला घेऊन गेले. तर आ.नितेश राणेचे खासगी सचिव राकेश परब यांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर णकवली पोलिस राकेश परब यांना घेऊन मालवणला रवाना झाले.
भाजप आमदार नितेश राणे यांनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर ते गोव्यात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळेच त्यांना गोव्याकडे नेण्यात आले आहे.