सिंधुदुर्ग: कासार्डे हायस्कूलमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा;700 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी

0
25

तळेरे:- प्रतिनिधी

भारतीय प्राचीन संस्कृती मध्ये योग, योगासने, योगसाधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.सोमवारी २१जून रोजी जगातील १९७ देशात योग दिन विविध उपक्रमाने साजरा केला जातो. कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सहज आणि सोपी योगासने आणि प्राणायाम सादर करीत हा योग दिन साजरा केला.

संस्था पदाधिकारी प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य एम.डी‌ खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर,यांच्या विशेष उपस्थितीत योग मार्गदर्शक संजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांच्या नियोजनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने आणि विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय योगाची प्रात्यक्षिके सादर केली.या उपक्रमात विद्यालयातील सुमारे ७०० पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.याप्रसंगी स्थानिक व्यवस्था कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, प्राचार्य मधुकर खाड्ये, पर्यवेक्षक नारायण कुचेकर व विद्यालयाच्या शिक्षक शिक्षिकांनीही योगासनाच्या प्रात्यक्षिकात उत्साहाने सहभाग घेतला होता.

दरम्यान योग मार्गदर्शक संजय भोसले यांनी मानवी जीवनात योगा व प्राणायामचे महत्व विशद करीत विद्यार्थ्यांकडून विविध योगासने व प्राणायाम करुन घेतली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड यांनी केले तर आभार पर्यवेक्षक नारायण कुचेकर यांनी मानले. सध्या कोरोनाचे सावट कमी झाल्याने विद्यार्थी वर्गात या योग दिनाला विशेष उत्साह दिसून येत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here