सिंधुदुर्ग: कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर

0
107
आमदार वैभव नाईक

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

आ. वैभव नाईक यांचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा

कुडाळ: नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हि कामे मंजूर करून घेतली आहेत. पावसाळ्यानंतर या कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती आ. वैभव नाईक यांनी दिली.

यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील लक्ष्मी मंदिर ते पॅलेस हॉटेलपर्यंत रस्ता नुतनीकरण करणे, व कुडाळ नगरपंचायत हद्दीतील कन्या शाळा ते लक्ष्मी मंदिरपर्यंत रस्ता नुतनीकरण करणे या दोन कामांसाठी निधी १४ लाख, कुडाळ नगरपंचायत हद्दीतील डॉ. नवांगुळ हॉस्पिटल ते रावराणे पर्यंत दुतर्फा बंदिस्त आर सी सी गटार बांधणे, व कुडाळ नगरपंचायत हद्दीतील तालुका क्रिडा संकुल मैदान येथे हायमास्ट बसविणे या दोन कामांसाठी निधी १३ लाख, तसेच कुडाळ नगरपंचायत हद्दीतील एमआयडीसी येथे घनकचरा व्यवस्थापनाच्या जागेस कंपाऊंड वॉल बांधणे निधी ३८ लाख रु. हि कामे नव्याने मंजूर करण्यात आली आहेत.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here