सिंधुदुर्ग : कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय कवी संमेलन संपन्न

0
69
संत राऊळ महाराज महाविद्यालयात जिल्हास्तरीय कवी संमेलन

प्रतिनिधी अभिमन्यू वेंगुर्लेकर

कुडाळ: संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथील वाडमय चर्चा मंडळाद्वारे जिल्हास्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे सन्माननीय सदस्य व कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सरकार्यवाह सन्माननीय श्री अनंत वैद्य सर हे उपस्थित होते‌. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना नवकवींनी कविता लिहिण्यापूर्वी सर्व कवितांचा व उपलब्ध साहित्याचा अभ्यास करून खरी कविता लिहिण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर खरी कविता कशी लिहावी या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कवयित्री सौ स्वाती सावंत को. म.सा.प. सिंधुदुर्ग याही कार्यक्रमाला उपस्थित होत्या. व त्यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. डिसले यांनी स्व- कथनातून विद्यार्थ्यांनी चांगले विचार व चांगला दृष्टिकोन ठेवून चांगली कविता लिहिण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ शरयू आसोलकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष वालावलकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ भारत तुपेरे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ भास्कर, प्रा. जमदाडे, नवकवी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here