सिंधुदुर्ग : कुडाळ शहर नळपाणी योजनेसाठी आ. वैभव नाईक यांच्या मागणीनुसार ना. एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिवांना प्रस्ताव सादर कर आदेश

0
126
आमदार वैभव नाईक
सार्वजनिक बांधकाम कार्यालयात तोडफोड प्रकरणी आ. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल

५० कोटी निधी मंजूर करण्याची आ. वैभव नाईक यांची मागणी

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

कुडाळ – कुडाळ नगरपंचायत मार्फत सुरु असलेली शहरातील नळपाणी योजना जीर्ण झाली असून शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता हि बाब आमदार वैभव नाईक यांनी लक्षात घेऊन तातडीने नवीन नळपाणी योजना मंजूर करण्याच्या दृष्टीने त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. या नळपाणी योजनेसाठी राज्य नगरोत्थान योजनेंतर्गत ५० कोटी रु. निधीची तरतूद करण्याची मागणी आज आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीची दखल घेऊन ना. एकनाथ शिंदे यांनी कुडाळ शहराच्या नवीन नळपाणी योजनेसाठी प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव तसेच कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले आहेत.

कुडाळ शहर हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत वसली आहे. नवीन नळयोजना हि शहराची महत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवकांनी , तसेच शहरवासीयांनी देखील आमदार वैभव नाईक यांच्याकडे नवीन नळपाणी योजनेसंदर्भांत मागणी केली होती. आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत भेट घेऊन नळपाणी योजनेसाठी ५० कोटी रु. निधीची मागणी केली असून ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रस्ताव सादर करून, मंजुरी मिळवून नळपाणी योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

     

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here