सिंधुदुर्ग: केंद्र अन् राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल’ : विनायक राऊत

0
39
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

प्रतिनिधी- अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- रत्नागिरीतील प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध कायम आहे. रत्नागिरीत रिफायनरी संदर्भात सुरू असलेल्या सर्वेक्षणाची पाहणी करण्यासाठी आलेल्या भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणेंचा ताफा अडवला असून महिलांनी ठिय्या देत याविरोधात निषेध व्यक्त केला. रिफायनरीच्या सर्वेक्षणासाठी निलेश राणे बारसू गावात पोहचले. तसेच आम्ही चर्चेसाठी तयार असल्याचं निलेश राणे यावेळी म्हटलं आहे. सदर प्रकरणावरुन शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे.
केंद्र आणि राज्यातील सरकार हे रिफायनरीचे दलाल आहे. ते रिफायनरीचे समर्थक आहेत. त्यामुळे बारसूत रिफायनरी प्रकल्प राबवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच आंदोलकांचं प्रामाणिकपणे म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये. सरकारी धाक दाखवण्यात येत असल्याचं विनायक राऊतांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here