कोकण रेल्वे कॉर्पोरेश लिमिटेडने वरिष्ठ आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.या पदांच्या भरतीसाठी त्यांनी अर्ज मागवले आहेत. परीक्षा न देता उमेदवार ही नोकरी मिळवू शकता. मुलाखतीद्वारेउमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 14 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये अधिक माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांनी विहित पत्त्यावर अर्ज आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. 11, 13 आणि 14 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये मुलाखती होणार आहेत. नोंदणी फक्त मुलाखतीच्या तारखेला सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या वेळेत करता येईल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
एकूण रिक्त 14 पदं असून त्यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) – 7 पदं आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल) – 7 पदं भरण्यात येणार आहेत.निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रुपये दरमहा पगार मिळेल.या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून किमान 60% गुणांसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षे आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांसाठी उमेदवाराचे वय 25 वर्षे असावे.
या भरतीसाठीची मुलाखत यूएसबीएलआर प्रकल्प मुख्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, सत्यम कॉम्प्लेक्स, मार्बल मार्केट, एक्स्टेंन- त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (UT) पिनकोड – 180011 येथे होणार आहे.


