सिंधुदुर्ग: : महाराष्ट्रात साहसी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी जमीन, हवा व पाणी या विविध उपक्रमांसाठी साहसी पर्यटन धोरण जाहीर केले आहे, अशी माहिती नवी मुंबई पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.
कोकण विभागात जमीन, हवा पाणी यावर साहसी पर्यटन उपक्रम राबविणाऱ्या कार्यरत असणाऱ्या किंवा नवीन उपक्रम सुरु करु इच्छिणाऱ्या सर्व संस्था, व्यक्तीसमुह यांना www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यात यावे. या साहसी पर्यटन उपक्रमाची नोंदणी पर्यटन संचालनायाकडे (DoT) येथे करावी.
साहसी पर्यटन उपक्रमांची नोंदणी करण्याची कार्यपध्दती
- www.maharashtratourism.gov.in या संकेत स्थळावर
- Menu- Registration forms- Adventure Registration यावर Click करुन
- Online अर्ज व आवश्यक कागदपत्रे उपलोड करावे.
अधिक माहितीसाठी
पर्यटन संचालनालय उपसंचालक पर्यटन,
प्रादेशिक कार्यालय कोकण भवन,
सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई
किंवा
पर्यटन संचालनालयाचे नरीमन भवन,
156/ 157/ 15वा मजला,
नरीमन पाँईट,
मुंबई -21
येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.