ओरोस– खेलो इंडिया योजनेंतर्गत निवड केलेल्या खेळाडूंना सावंतवाडी येथील टिळक सभागृहामध्ये खासदार श्री. राऊत यांच्या हस्ते क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बोलताना.’ सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा क्षेत्रात नावारूपास यावा, इथले खेळाडू ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत चमकावेत. यासाठी जिल्ह्यातील खेळाडूंना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने नेहमीच प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. तसेच केंद्र शासनाची खेलो इंडिया ही योजना यशस्वीरित्या राबवावी असे आवाहन ही श्री. राऊत यांनी केले. यावेळी आमदार दीपक केसरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.
खासदार श्री राऊत म्हणाले, प्रत्येक जिल्ह्यात मुला मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. हे टॅलेंट ओळखून त्यांना आवश्यक ते पाठबळ देण्याचे काम केंद्र शासन करत आहे. केंद्र शासनाकडून खेलो इंडिया या योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.’राज्य शासनाच्या माध्यमातूनही तालुकास्तरावर क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. क्रीडा क्षेत्रात हा जिल्हा नावारूपास येण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून येथे आवश्यक सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत’.
आज इतर खेळाप्रमाणे कबड्डीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. सावंतवाडी शहराला कबड्डीची परपंरा आहे. तालुक्यात चांगले खेळाडू आहेत. आज ज्या विद्यार्थाची निवड झाली आहे त्यांना भविष्यात आपले नाव कमावण्याची मोठी संधी आहे. मात्र खेळाबरोबरच अभ्यासाकडेही तितकेच लक्ष द्या असे आवाहन आमदार श्री.केसरकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी, श्रीमती सिरस यांनी खेलो इंडिया या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत आम्ही मुलांची निवड करत आहोत. निवड केलेल्या मुलांना पुढील चार वर्ष कोच मार्फत योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे असेही सांगितले . यावेळी निवड झालेल्या मुलांना किटचे वाटप करण्यात आले. .


