वेंगुर्ला प्रतिनिधी -वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी गणित संबोध परीक्षेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होत घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत प्रशालेचे एकूण ९ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत शाळेने १०० टक्के यश संपादन केले आहे. शाळेतील इयत्ता ५वीमधून सात विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यात विशेष प्राविण्यासह दोन व प्रथम श्रेणीत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. इयत्ता आठवीमधून दोन विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत यश संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापक मिताली होडावडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांना गणित शिक्षिका संजया परब, धनश्री तुळसकर, पांडुरंग मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व पालक यांच्यावतीने अभिनंदन केले.
फोटोओळी – मुख्याध्यापक मिताली होडावडेकर यांनी गणित संबोध परिक्षेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान केले.


