सिंधुदुर्ग: गोळवण शिवसेनेच्या वतीने खा. अनिल देसाई यांचा सत्कार

0
99

प्रतिनिधी – पांडुशेठ साठम

मालवण:शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत मालवण तालुक्यातील गोळवण येथील सारा रिसॉर्ट येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत गोळवण शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन खा. अनिल देसाई यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी त्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुंबईचे माजी नगरसेवक अशोक पटेल, सारा हॉटेलचे प्रो. प्रा.सुरेश सावंत, शिवसेना उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण, माजी उपतालुका प्रमुख राजू नाडकर्णी, गोळवण शाखा प्रमुख सुभाष सामंत, डिकवल शाखा प्रमुख भालचंद्र गावडे, जनार्दन गावडे, गणेश मुणगेकर, झिलू गावडे, मोहन पवार, गोळवण महिला शाखा प्रमुख मंगल चिरमुले, पप्पी मांजरेकर बाळाजी खरात आदी उपस्थित होते.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here