घाट रस्त्याची खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी
सिंधुदुर्ग:
घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या नवीन अलाइनमेंट केलेल्या ठिकाणी आज खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन पाहणी केली.सदर अलाइनमेंट बाबत ग्रामस्थांनी पर्याय सुचविले असून त्या पर्यायांचा विचार करून नवीन अलाइनमेंटचा सर्व्हे करण्याचे आदेश खा. विनायक राऊत यांनी अलाइनमेंट करणाऱ्या मोनार्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावर १० दिवसांत कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले. घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या कामामध्ये अधिकाऱ्यांकडून वेळकाढूपणा होतोय. त्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी संघर्ष समिती सोबत चर्चा करून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
गेले अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घोटगे सोनवडे घाट रस्त्याची केलेली अलाइनमेंट अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ग्रेड नुसार झालेली नव्हती. या अलाइनमेंट नुसार रस्त्यावरून गाडी चढणार नाही हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर झालेल्या घोटगे सोनवडे घाट रस्त्याच्या आढावा बैठकीत खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर शासनाकडून नवीन अलाइनमेंट करण्याचे निश्चित करण्यात आले. आज सोनवडे येथे नवीन अलाइनमेंट केलेल्या घाट रस्त्याच्या ठिकाणी खा. विनायक राऊत व आ. वैभव नाईक यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. मात्र ग्रामस्थांनी हि नवीन अलाइनमेंट चुकीची असल्याचे सांगत दुसऱ्या ठिकाणी अलाइनमेंट करण्यासाठी पर्याय सुचविले. त्या पर्यायांना खा. विनायक राऊत यांनी मान्यता दिली असून ग्रामस्थांनी सुचविलेल्या पर्यायानुसार नवीन अलाइनमेंटचा सर्व्हे करण्याचे आदेश खा. विनायक राऊत यांनी अलाइनमेंट करणाऱ्या मोनार्ज कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावर १० दिवसांत कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
यावेळी सार्वजनिक बांधकाम रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अनामिक जाधव, सावंतवाडी वनविभाग उपवनसंरक्षक शहाजी नारनवर , वनविभागाचे श्री. शिंदे,जि. प.सदस्य लॉरेन्स मान्येकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, ,कृती समितीचे नारायण गावडे, श्री. ढवळ, रुची राऊत, निशांत तेरसे, गीतेश सावंत,अर्चना मढव, तेजस भोगले, छोटू पारकर, बाळू पालव आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.