मुंबई : गणपती उत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरणान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती उत्सवानिमित्त गणपती विशेष गाड्या धावणार आहेत. गणपती उत्सवा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.*
लोकमान्य टिळक ते मंगळुरू एसी साप्ताहिक विशेष
लोकमान्य टिळक येथून ही गाडी रात्री आठ वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजून पाच मिनिटांनी ती मंगळुरू जंगशनला पोहोचेल. ही गाडी 24 आणि 31 ऑगस्ट व 7 सप्टेंबर रोजी असेल. याबरोबर हीच गाडी मंगळुरू जंक्शन येथून 25 ऑगस्ट, 1 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर रोजी रात्री सव्वा आठ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी साडे पाच वाजता लोकमान्य टिळक येथे पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर (एच), कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर थांबेल.
ही गाडी 22 एलएचबी कोचची असेल. यात फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 03 कोच, थ्री टायर – 15 कोच, पँट्री कार – 01, जनरेटर कार – 02 अशी रचना असेल.
करोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणवासी आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता करोनाचा प्रादुर्भाव सुरू असला तरी, नियम शिथिल करण्यात आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाण्याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे या विशेष गाड्यांमुळे चाकरमान्यांमध्ये आंदाचे वातावरण आहे. यंदा गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला आली आहे. परंतु, त्याआधीच चाकरमानी कोकणात जाण्याची तयारी करत आहेत.


