प्रतिनिधी- पांडुशेठ साठम
एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेमध्ये शिरगाव हायस्कूलचे १३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. परीक्षेमध्ये सर्व 13 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
त्यापैकी तीन विद्यार्थी ए ग्रेड मध्ये पाच विद्यार्थी बी ग्रेड मध्ये व पाच विद्यार्थी सी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व त्यांना मार्गदर्शन करणारे चित्रकला शिक्षक श्री विनोद चौगुले सर यांचे शाळेच्या मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले आहे तर ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले आहे.