सिंधुदुर्ग: चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा पार!

0
146

सिंधुदुर्गच्या चिपी परुळे येथील विमानतळाचा आज शुभारंभ झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर असल्याचे पाहायला मिळाले.दोघांची खुर्ची देखील आजुबाजूलाच ठेवण्यात आली होती. या दोघांनी दिपप्रज्वलन केले. मात्र एकमेकांकडे पाहिले देखील नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे देखिल व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते. आज अनेक वर्षांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. पण नारायण राणेंनी या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रृत आहे. आज अनेक वर्षांनंतर दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दोघांमध्ये संवाद होणार का? याची अपेक्षा सर्वांना होती.परंतु या सोहळ्यात दोघांनी एकमेकांना नमस्कारही केला नाही. एकमेकांच्या बाजुला बसून देखील या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.पण दोघांची शाब्दीक चकमक येथे पाहायला मिळाली. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनीही भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाषण करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना महाराष्ट्राचे लाडके आणि देशातील एक नंबरचे मुख्यमंत्री असा केला. यावेळी ते म्हणाले की, अनेकांनी या विमानतळाच्या उद्घाटनाला उशीर झाला असल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, पायगुण लागतो म्हणतात. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन होत आहे. यासोबतच या विमानतळासाठी खासदार विनायक राऊत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासोबतच सर्वांच्या प्रयत्नातून हे स्वप्न साकार होत असल्याचे देसाई म्हणाले.

यावेळी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणेंच्या टोलेबाजीत यांनी सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचे म्हणाले. उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनेच मी सिंधुदुर्गाचा विकास केला असेही नारायण राणे म्हणाले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उडणारे विमान डोळे भरुन पाहावे या हेतूने मी येथे आलो आहे.माझ्या मते विमानतळ होणे आवश्यक आहे. प्रवाशांना सुखसोयी मिळणे महत्त्वाचे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आर्थिक समृद्धी यावी हीच माझी इच्छा आहे.माझा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला आहे. 90 साली मला बाळासाहेब ठाकरे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात तू जा, तुला मागणी आहे. मी येथे निवडून आलो. मी हा जिल्हा पाहिला. या जिल्ह्यातील अडचणी देखील मी दूर केल्या.फेब्रुवारीनंतर जिल्ह्याला पाणी देखील नव्हते. पुरेसे रस्ते नव्हते. महामार्गाची दुर्दशा झालेली होती. गावांमध्ये वीज नव्हती. यानंतर या भागाचा विकास मी केला.सिंधुदुर्गात ज्या पायाभूत सुविधा तयार झालेल्या आहेत, यासाठी कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव तिथे येऊच शकत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा नारायण राणेंनी केली होती. पण नारायण राणेंनी या कार्यक्रमात कोणतेही राजकारण करणार नसल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील राजकीय वैर हा सर्वश्रृत आहे. आज अनेक वर्षांनंतर दोघेही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. या दोघांमध्ये संवाद होणार का? याची अपेक्षा सर्वांना होती.परंतु या सोहळ्यात दोघांनी एकमेकांना नमस्कारही केला नाही. एकमेकांच्या बाजुला बसून देखील या दोघांनी एकमेकांकडे पाहिले देखील नाही.पण दोघांची शाब्दीक चकमक येथे पाहायला मिळाली. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टोलेबाजी केली. तर मुख्यमंत्र्यांनीही भाषणाच्या सुरुवातीपासूनच त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले.

पुढे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे असेही म्हणाले,’ उद्धवजी एक विनंती आहे. याच जागेवर मी भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळी आंदोलन केली जात होती. भूमिसंपादन करु देणार नाही. आम्हाला विमानतळ नकोय असेही बोलले जात होते. त्या राजवटीमध्ये मी ते मंजूर केले आहे. किती विरोध, किती विरोध… मी आता जर नावे घेतली तर राजकारण होईल. अजित पवार साहेबांनी सीवर्ल्डच्या अधिग्रहणासाठी 100 कोटी रुपये दिले. पण काय झाले? ते कुणी रद्द केले? कोण तिथे कोणाची आंदोलने सुरु होती? ते सर्व आहेत स्टेजवर. भांडं काय फोडायचे आणि किती फोडायचं? तुम्ही समजताय तसे इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. म्हणून परिस्थिती बदलते आहे. मला फक्त म्हणायचंय, तुम्ही आलात, मला बरे वाटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठाकरे शैलीचा वापर केला. मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, आजचा क्षण हा आदळापट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. माझ्यासाठी हा सौभाग्याचा दिवस आहे. कुणी काय केले आणि कुणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोकणाची संपत्ती आपल्याला जगासमोर न्यायची आहे. कोकणचे कॅलिफोर्निया करु असे अनेकजण म्हणायचे. बाळासाहेब म्हणाले होते, कोकणला कॅलिफोर्नियापेक्षा भारी बनवा. कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. या विमानतळामुळे अनेकांना लाभ होणार आहे. कोकणाच्या मातीमध्ये आंब्याची झाडे उगवतात तसे बाभळीचे झाड देखील उगवत असते. त्यामध्ये मातीचा दोष नसतो. त्यामुळे कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

नारायणराव आपण म्हणता ते खरे आहे. तुम्ही जी विकासकामे केली त्यात तुमचे योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असे अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरे आहे की, बाळासाहेबांना खोटे बोलणारी लोके आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटे बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केला आहे.पाठांतर करुन बोलणे वेगळे, आत्मसात करुन बोलणे वेगळे, तळमळीने बोलणे वेगळे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.अनेक लोक विकासाच्या गोष्टी बोलून गेले, तेच मी आता बोलणार नाही.

चिपी विमानतळ आणि तिथे होणार प्रत्येक क्षण बघण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते. सगळ्यांनाच विमानतळाचे अप्रूप होते. पण महत्वाचे होते ती राजकीय सत्ताधारी नेत्यांची भाषणे आणि त्यातून होणारे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आरोप. पण एकूण सोहळा अतिशय सुंदर आणि शांततापूर्ण झाल्याने सगळ्यांनीच निश्वास सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here