प्रतिनिधी पांडुशेठ साठम
श्री. माऊली मंदिर पडोसवाडी चेंदवण जि. प. शाळा क्र. २ येथे उभारण्यात आलेल्या सभामंडपाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते आज फित कापून उदघाटन करण्यात आले. या कामासाठी आ. वैभव नाईक यांनी २५/१५ योजनेतून ३ लाख रु. मंजूर करून दिले आहेत. याबद्दल ग्रामस्थांनी पुष्पगुच्छ देऊन आ. वैभव नाईक यांचे आभार मानले.
यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे कुडाळ अध्यक्ष अतुल बंगे, राजू गवंडे, सरपंच उत्तरा धुरी, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत तेंडुलकर, मागास वर्गीय सेलचे तालुकाप्रमुख रूपेश चेंदवणकर, शाखा प्रमुख हेमंत जुवेकर, महिला विभाग प्रमुख प्रणाली तेंडोलकर, ग्रा. प सदस्य चंद्रभागा चेंदवणकर, तनया आंबेरकर, रेवती तोरसकर, देवेंद्र नाईक, गंगा भरडकर,अविनाश श्रुंगारे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


