सिंधुदुर्ग : जनता सेवा मंडळाचा विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न

0
31
जनता सेवा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात सरपंच पपू यांच्या हस्ते गौरव

वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता सेवा मंडळ मुंबई आणि वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच परबवाडा येथे पार पडला.

यात परबवाडा ग्रामपंचायत परिसरातील पहिली ते पंधरावी इयत्तेतील गुणवान विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती, वक्तृत्व, खेळ आणि स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश संपादन करणा-या मुलामुलींचा समावेश होता. या कार्यक्रमाला सरपंच विष्णू उर्फ पपू परब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप परब, जनता सेवा मंडळाचे मुंबई अध्यक्ष उदय परब, वेंगुर्ला अध्यक्ष संजय परब, उपसरपंच हेमंत गावडे आणि इंग्रजी विषय शिक्षक जयंत कांबळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

इंग्रजीचे भयगंड मुलांना नोकरी मिळवताना अडचणीचे ठरते. यासाठी प्राथमिक पातळीवरच त्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावायला हवी. अखिल परबवाडा ग्रामविकास मंडळाच्या पुढाकाराने जनता सेवा मंडळाच्या कार्यालयात गेले वर्षभर इंग्रजी वर्ग सुरू आहेत. मोफत सुरू असलेल्या या वर्गाचा अधिकाधिक मुलांनी मुलांनी घ्यायला हवा, असे आवाहन जयंत कांबळी यांनी केले. सरपंच पपू परब यांनी शैक्षणिक उपक्रमांबरोबर परिसरात सुरु असलेल्या आणि सुरू होणा-या सामाजिक कामांची माहिती दिली. सहदेव परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अशोक परब यांनी आभार मानले.

फोटोओळी – जनता सेवा मंडळाच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात सरपंच पपू यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here