विंधन विहिर पुन: र्भरण,विहिर पुन:र्भरण,छतावरील पाऊस पाणी संकलन, पाणी गुणवत्ता व सनियंत्रण सर्वेक्षणाचे महत्व तसेच कोरोना साथ विषयी जन जागृती चित्ररथाच्या माध्यमातून भूजल साक्षरता अभियान राज्यात सुरु आहे.राज्यातील नागरिकांना स्वच्छ आणि शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी सर्वांनी जलसाक्षर होणे आवश्यक आहे.त्याकरिता गावा गावात जल साक्षरता वाढविण्यासाठी भूजल साक्षरता वाढवणे हे अभियानाचे मुख्य उदिष्ट आहे.
या अभियानाचा एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्हयात भूजल सर्वेंक्षण आणि विकास यंत्रणेच्या चित्ररथ जलसाक्षरता अभियानचे उद्घाटन विनायक ठाकूर, उप मुख्यकार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले. यावेळी सागर देसाई, वरिष्ठ भूवैज्ञानिक, डॉ. प्रशांत सवदी, जिल्हा साथरोग अधिकारी, मजहर शेख, शाखा अभियंता (यां) व मुकुंद माळी, तांत्रिक अधिकारी यांच्या सह विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या निमित्त जिल्ह्यातील प्रमुख शहर ग्रामपंचायतीमध्ये चित्ररथ दाखवून ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य व नागरिकांना चित्ररथाव्दारे भूजलसाक्षरतेची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमात जिल्हयातील ग्रामस्थांचा चांगला प्रतीसाद मिळत आहे. असे सागर देसाई प्रभारी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांनी कळवितात.


