सिंधुदुर्ग जिल्हयातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पदभरती

0
83

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र रज्यात एकूण ७४२५ सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत. या पदाकरिता इच्छुक सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या,खालील पात्रता पूर्ण करत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हयातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर कोणत्याही परिस्थितीत दिनांक ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळख पत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देऊन आपले नाव नोंदवावे. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, यांनी केले आहे.

आवश्यक पात्रता पुढील प्रमाणे वय १ ऑक्टोबर २०२१ ला ४५ वर्षापेक्षा कमी असावे, शिक्षण कमीत कमी ८ वी पास व १२ वी पास नसवा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी १५ वर्ष, सैन्य दलातील हुद्दा जास्तीत जास्त Hav and below. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी Good. Medical Cat AYE,SHAPE-1 अशी माहिती सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here