कोरोनाच्या काळात शिथिल झालेल्या नियमांमुळे आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात कोकणात चाकरमानी तसेच इतर लोकांची गर्दी होणार आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांची मोठी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या नियोजनासाठी आतापासूनच नियोजनास सुरुवात केली आहे.आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी खारेपाटण तपासणी नाका येथील वाहनतळाची ही पहाणी केली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कणकवली रेल्वे स्टेशनलाही भेट दिली.
खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या थांब्याबाबत नियोजन कसे करावे यासाठी सूचना दिल्या.तसेच परिवहन मंडळाने प्रवाशांच्या कोरोनाच्या तपासणीसाठी स्वतंत्र बुथ उभारावा असेही सांगितले. येणाऱ्या प्रवाश्यांची संख्या लक्षात घेता मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, रेल्वे स्टेशन येथे पथकांची संख्या वाढवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या.पोलीस पथकांची संख्या वाढवण्याची सूचना पोलीस अधिक्षक यांनी यावेळी केली. जिल्हाधिकारी यांनी खारेपाटण तपासणी नाका येथील वाहनतळाची ही पहाणी केली.
.