सिंधुदुर्ग : जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन

0
36
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्गच्या वतीने कोविड-19 च्या कालखंडानंतर प्रथमच सन 2022-23 या वर्षासाठी असलेल्या जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हास्तरीय हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्यात येणार आहे.

या स्पर्धेसाठी दिनांक 04 ऑगस्ट 2022 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नांमेट सोसायटी नवी दिल्लीच्या वतीने सन 2022-23 या वर्षातील ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 2 सप्टेंबर 2022 ते 9 ऑक्टोबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) आणि 17 वर्षाखालील मुले व मुली (ज्युनिअर) या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख पुढीलप्रमाणे असावी. 1) 15 वर्षाखालील मुले (सब ज्युनिअर) साठी दि. 01 नोव्हेंबर 2007 किंवा त्यानंतर जन्मलेला, 17 वर्षाखालील मुले (ज्युनिअर) साठी दि. 01 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर जन्मलेला, 17 वर्षाखालील मुली (ज्युनिअर) साठी दि. 01 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतर जन्मलेली असावी. 2) त्याचबरोबर या स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्या सर्व शाळा / संघांनी आपल्या संघाच्या प्रवेशिका तसेच स्पर्धा सहभाग शुल्क /फी दि. 03 ऑगस्ट 2022 पर्यंत http://sindhudurga.mahadso.co.in/school या लिंकव्दारे ऑनलाईन जमा करण्यात यावी. 3) अधिक माहिती करीता क्रीडा अधिकारी, मनिषा पाटील (मो. नं. 7588461688) यांच्याशी संपर्क साधावा. ज्या संघाची नोंदणी वेळेत सादर केली नाही अशा संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी. 4) सन 2022-23 च्या स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविड-19 बाबत काही सूचना आल्यास त्यानुसार निर्णय घेण्यात येईल. सद्यस्थितीत कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केलेले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here