सिंधुदुर्ग : जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत परुळेबाजार प्रथम तर ग्रामपंचायत निरवडेने व्दितीत क्रमांक पटकाविला

0
64
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

ओरोस: जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2021-22 अंतर्गत ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांनी प्रथम तर ग्रामपंचायत निरवडे, ता. सावंतवाडी व्दितीत क्रमांक प्राप्त केला असून या दोन्ही ग्रामपंयतीची निवड विभागस्तरासाठी संत गाडगेबाबा अभियानाकरीता करण्यात आली आहे. या स्पर्धेत ग्रामपंचायत खांबाळे ता. वैभववाडी यांनी तृतीत क्रमांक पटकावला आहे. लवकरच विभागस्तर तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2021-22 अंतर्गत जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ वार्ड जाहिर करुन रक्कम रुपये 10000/- दहा हजार चे पारितोषिक देण्यात देय आहे. ग्रामपंचायती मधुन तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी करुन जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात आली होती. तालुक्यास्तरावर जिल्हा परिषद प्रभागात असणाऱ्या स्वच्छ ग्रामपंचातीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2021-22 अंतर्गत रक्कम रुपये 50000/- पन्नास हजार चे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.

तालुकास्तरावरुन जिल्हा परिषद प्रभागनिहाय आलेल्या 50 ग्रामपंचायतीची जिल्ह्यस्तरीय समितीने तपासणी मध्ये ग्रामपंचायत परुळेबाजार ता. वेंगुर्ला यांना प्रथम क्रमांक रक्कम रुपये 5 लक्ष, व्दितीय क्रमांक निरवडे ता.सावंतवाडी यांना व्दितीय क्रमाक रक्कम रुपये 3 लक्ष, तर तृतीय क्रमांक ग्रामपंचायत खांबाळे ता. वैभववाडी रक्कम रुपये 2 लक्ष पारितोषिक प्राप्त केले आहे. त्याचप्रमाणे संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारुर ता. कुडाळ रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केले आहे. शौचालय व्यवस्थापनासाठी देण्यात येणारा स्व.आबासाहेब खेडेकर पुरस्कार ग्रामपंचायत असलदे ता. कणकवली रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केला आहे. तर पाणी गुणवत्ता व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत मळेवाड ता. सावंतवाडी रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केले आहे.

जिल्ह्यस्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम व व्दितीत येणाऱ्या ग्रामपंचातीची निवड विभागास्तरावर करण्यात येते. सन 2021-22 करीता जिल्ह्यातील ग्रामपंचायत परुळेबाजार व निरवडे यांची निवड करण्यात आली आहे. मागिल दोन वर्षात संत गाडगेबाबा अभियानात विभागस्तरावर जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचातीचेच वर्चस्व राहिले आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here