सिंधुदुर्ग: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

0
196
उन्हाळी प्रशिक्षण

वेंगुर्ला: खेळाच्या प्रचार व प्रसार यानुसार फक्त खेळाडूंचा जास्तीत जास्त सहभाग व संघाची संख्या वाढवणे यावर लक्ष केंद्रित न करता गावपातळी पासून चांगले खेळाडू तयार होणे अपेक्षित आहे. यासाठी 8 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तर, जिल्हास्तरावर खेळ निहाय व शारीरिक क्षमता खेळांचे प्राथमिक कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन झाल्यास खेळामध्ये सहभाग वाढून, शारीरिक क्षमता, शारीरिक सुद्दढता यामध्ये वाढ होऊन शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार आहे.

यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. रस्सीखेच कुडाळ हायस्कुल कुडाळ येथे दिनांक 25 एप्रिल ते 5 मे 2022 सकाळी 9ते 11 यावेळी, तसेच मैदानी तालुका क्रीडा संकुल, वेंगुर्ला येथे दिनांक 26 एप्रिल ते 6 मे 2022 सकाळी 7 ते 9 या वेळेत, खो-खो तालुका क्रीडा संकुल,वेंगुर्ला येथे दिनांक 26 एप्रिल ते 6 मे 2022 सकाळी 7 ते 10 यावेळी. कबड्डी तालुका क्रीडा संकुल वेंगुर्ला येथे दिनांक 26 एप्रिल ते 6 मे 2022 सायंकाळी 4 ते 6 या वेळेत. बॅडमिंटन जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे दिनांक 22 मे ते 30 मे 2022 सकाळी 8 ते 10 या वेळेत. जलतरण जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे दिनांक 22 मे ते 30 मे 2022 सकाळी 10 ते 12 या वेळेत आयोजन केले आहेत. तरी सर्व खेळाडुंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग यांनी जिल्हावासियांना केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here