ओरोस: जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२०-२१ साठी ग्रामसेवक,ग्राम विकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीपणे करुन ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे राहणीमान उंचावण्यास व अडचणी सोडवण्यास सर्वतोपरी सहाय्य करणाऱ्या ग्रामसेवकांना प्रोत्साहित करुन त्यांचा गौरव करण्यासाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात येतात.
प्रत्येक गटातून एक या प्रमाणे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी प्रजित नायर याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समिती सभेमध्ये निवड करण्यात आलेली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामसेवकांमधून खालील ग्रामसेवकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
देवगड तालुक्यातील दाभोळे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, प्रदिप रमेश नारकर,
कुडाळ तालुक्यातील कवठी ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, सतिश श्रीधर साळगावकर,
मालवण तालुक्यातील कातवड,घुमडे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, युती युवराज चव्हाण.
कणकवली तालुक्यातील नरडवे ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, वैभव विनायक धुमाळ.
दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक नामदेव अर्जुन परब.
वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, शरद श्रीरंग शिंदे.
वैभवाडी तालुक्यातील गडमठ, ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, सुनिल मनोहरराव नागरगोजे.
सावंतवाडी तालुयातील आंबेगाव, ग्रामपंचातीचे ग्रामसेवक, अमित आत्माराम राऊळ .
या सर्व ग्रामसेवकांना त्यांनी केलेल्या चांगल्या आणि लोकहितकारी सेवेसाठी आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील यांनी दिली