सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे पती समीर नाईक यांचेनिधन

0
102

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्या सौ.समिधा नाईक यांचे पती समीर नाईक यांचे गुरुवारी रात्री ८-30 च्या दरम्यान कोल्हापूर येथील एका खाजगी रूग्णालयात उपचारा दरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.* आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून २०१२ मध्ये समिर नाईक हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते.

२०१२ ते २०१७ या पाच वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी सदस्य समीर नाईक यांनी आपल्या कालावधीत विविध विकास कामे आणली होती.तर ते आपल्या मतदार संघात गोरगरिबांनाही ते मदतीचा हात नेहमी पुढे करत असत.त्यामुळे सामाजिक कार्यकर्ता म्हणून समिर नाईक यांची मोठी ओळख होती.तर मित्र परिवारही त्यांचा खुप मोठा आहे.तसेच ते नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते.त्यांच्या अचानक निधना मुळे वेतोरा गावासह वेंगुर्ला तालुक्यासहित सिंधुदुर्ग जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

See Translation631People Reached35EngagementsBoost Post

661 Comment1 ShareLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here