जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत ‘एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प‘ सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी मदतनीस पद भरण्यात येत आहे.
- -सावंतवाडी अंतर्गत माजगांव कासारवाडा, डिंगणे धनगरवाडी, चराटे तिलारी कॉलनी अंगणवाडी येथे मदतनीस या पदासाठी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.
- – अर्ज करण्याची मुदत 28 सप्टेंबर 2022 रोजी कार्यालयीन वेळेत सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे.
- -सदर अर्ज बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, प्रकल्प सावंतवडी यांच्या कार्यालयात सादर करावा. असे आवाहन सावंतवाडीचे एकात्मिक बालविकास सेवा योजना, प्रकल्प एकात्मिक बालविकास सेवा योजना, बाल विकास प्रकल्प अधिकारी संध्या मोरे यांनी केले आहे.
या जाहिरातीत नमुद केलेला शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच सावंतवाडी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर पाहण्यासाठी लावण्यात आली आहे. रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असली तरी पद भरती, कमी किंवा जास्त, किंवा संपूर्ण अथवा अंशता पदभरती प्रक्रीया कोणत्याही टप्यात रद्द करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आले असून याबाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही.
अधिक माहितीसाठी कार्यालयातील 9421267414 या दुरध्वनी क्रमांक संपर्क साधावा


