ओरोस: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे न्यायालयीन कर्मचारी व अधिकारी वर्ग जागतिक योगा दिवस साजरा करणार आहेत. जागतिक योगा दिवस दिनांक 21 जून 2022 रोजी सकाळी 8 वाजता साजरा करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी.बी.म्हालटकर यांनी दिली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग व तालुका विधी सेवा समिती मालवण, देवगड,कणकवली, वेंगुर्ला, सावंतवाडी यांच्या मार्फत जागतिक योगा दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच दिवाणी न्यायालय, कुडाळ व दोडामार्ग येथेही हा योग दिवस साजरा करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी योगा दिवस साजरा करावा असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश श्री. म्हालटकर यांनी केले आहे.


