सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयातील साहित्याच्या विक्रीसाठी निविदा पाठविण्याचे आवाहन

0
32
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण

सिंधुदुर्ग : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, सिंधुदुर्ग या कार्यालयातील निर्लेखित जडसंग्रह साहित्याची विक्री करण्यात येणार आहे .सदर विक्री परपत्रक पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.एफ. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग या कार्यालयातील विविध प्रकारच्या निर्लेखित जडसंग्रह साहित्याची दरपत्रक पद्धतीने विक्री करावयाची आहे. ज्यांना सदर साहित्य विकत घ्यावयाचे आहे त्यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयात दरपत्रक सिलबंद लिफाफ्यात दि. 25 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावीत असे या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे .

निविदा पाठविताना घालण्यात आलेल्या अटी निविदेच्या बंद लिफाफ्यावर स्वच्छ अक्षरात लॉट घेणाऱ्याचे नाव व संपूर्ण पत्ता नमुद करावा. दि. 25 फेब्रुवारी 2022 रोजी नंतर आलेल्या निविदांचा स्वीकार केला जाणार नाही. निविदा दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 5 वाजता उघण्यात येतील.

सदर विक्री करावयाचे निर्लेखित जड संग्रह साहित्या कार्यालयाच्या हॉलमध्ये सुट्टीचे दिवस वगळून कार्यलयीन वेळेत सकाळी 10.30 ते 5 वा.पर्यंत पाहता येईल. सदर निर्लेखित जडसंग्रह साहित्य हे आहे त्या स्थितीत आपल्या स्वखर्चाने नेण्याची व्यवस्था करावी. ज्या खरेदीदाराचा साहित्याचा दर जास्त असेल अशा पात्र खरेदीदारास सदरहू साहित्याची विक्री केली जाईल. ज्याचा दर मंजुर होईल त्याला ताबडतोब योग्य रक्कम भरून साहित्य स्वखर्चाने घेवून जावा लागेल. कोणतीही निविदा राखून ठेवण्याचा, विक्री रद्द करण्याचा अधिकार कार्यालय प्रमुखांना राहील. कोणतेही दरपत्रक स्वीकारणे अथवा नाकारणेचे अधिकार जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांनी राखून ठेवले आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here