सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटक मंत्रालयामार्फत दोन दिवसाची कार्यशाळा आयोजित

0
80

सावंतवाडी दि.9- पर्यटन क्षेत्रातील होणारे बदल आणि त्यादृष्टीने करावयाचे उपाय योजना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटक मंत्रालयामार्फत दोन दिवसाची कार्यशाळा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेणार असल्याची माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहसंचालक वेंकटेश न धट्टारेन यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यावसायिक सोशल मीडिया प्रमुख किशोर दाभोळकर यांनी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या मुंबई येथील कार्यालयाला भेट देऊन व्यंकटेशन यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विस्तार संदर्भात चर्चा केली. त्यावेळी व्यंकटेशन यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले .यावेळी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सहाय्यक संचालक जगदीप ठोंबरे भावना शिंदे उपस्थित होत्या .

यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनवाढीसाठी निवास न्याहारी योजना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टूर ऑपरेटरना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक निसर्गसंपन्न जिल्हा आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यात अनेक प्रकारे वाढ करता येऊ शकते. त्यादृष्टीने केंद्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयामार्फत वेळोवेळी सहाय्य केले जाईल असे श्री वेंकटेशन यांनी यावेळी सांगितले. दाभोळकर यांनी सोशल मीडियाद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची ओळख देशवासियांना सनवी सर्व जगातील पर्यटकांना करून दिल्याबद्दल व्यंकटेशन यांनी दाभोळकर यांचा सत्कार यावेळी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here