सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी कु. पार्थ संतोष गोसावीस वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर

0
79

सिंधुदुर्ग – विभागीय परीक्षा मंडळातून सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. कोविड -19 च्या कालावधीमूळे सदर पुरस्काराची रक्कम लाभार्थी विद्यार्थ्यास देण्यात विलंब झालेला होता.

सन 2018 -19 या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी कु. पार्थ संतोष गोसावी इयत्ता 10 वी मध्ये विजाभज प्रवर्गातून राज्यातून प्रथम आला असल्याने त्यास स्वर्गीय वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार जाहीर झालेला असून पुरस्काराची रक्कम 1 लाख रक्कमेचा धनादेश व प्रमाणपत्र, उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जातपडताळणी समितीचे प्रमोद जाधव यांच्या हस्ते देण्यात आला . जिल्हयतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून प्रथम क्रमाकांने येवून अशा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन दीपक घाटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here