सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई- संजीवनी ओपीडी सुविधा सुरु करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील नागरिकां घरी राहून त्यांच्या आजारावर वैद्यकीय सल्ला घेण्यात यावा म्हणुन ई- संजीवनी ओपीडी ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. तसेच कोविड व नॉन कोविड रुग्णांना घरी सुरक्षित राहुन वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मार्फत उपचार सल्ला मसलत करण्यात यावे हा या ई- संजीवनी ओपीडी कार्यक्रमाचा मुळ उद्देश आहे.
नागरिकांनी आपल्या ॲण्ड्रोइड मोबाईल मध्ये ई-संजीवनी ओपीडी हे ॲप इंन्स्टॉल करुन या सेवेचा लाभ घ्यायचा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आतापर्यंत 330 रुग्णांनी घर बसल्या या सेवेचा लाभ घेतलेला आहे. हा लाभ घेण्यासाठी डॉक्टरांशी सल्ला मसलत करण्यासाठी खालील नियमांचे पालन करावे, आपला मोबाईल नंबर सत्यापित, व्हेरीफाय करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटिफीकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहा व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला मसलत करा. ई- प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा .नागरिकांनी तसेच रुग्णांनी ई-संजीवनी ओपीडी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ ध्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.