सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड 19 मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन

0
88

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोविड 19 मुळे एक पालक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पालकांना महिला व बाल विकास कार्यालयातर्फे बाल संगोपन योजना तसेच कोविडच्या अनुषंगाने पूर्ण अनाथ झालेल्या कुटुंबांना आर्थिक लाभाबाबात समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळे, जिल्हा परिविक्षा अधिकारी भिकाजी काटकर, संस्था बाह्य संरक्षण अधिकारी दीपिका सावंत आदी उपस्थित होते. यावेळी एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना व त्यांच्या पालकांना दत्तक बाल संगोपन, अनाथ प्रमाणपत्र, शैक्षणिक शुल्क माफी, बँक खाते यासह महिला व बाल विकास विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

या बालक व पालकांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. रसाळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here