प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 8 आणि 9 मार्च रोजी गडगडाटासह पाऊस पडण्याची, विजा चमकण्याची व 30 ते 40 किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, तरी त्या अनुषंगाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.